Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तिघांचं कटकारस्थान अन् पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? सीबीआयचा कोर्टात धक्कादायक खुलासा !

तिघांचं कटकारस्थान अन् पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? 
सीबीआयचा कोर्टात धक्कादायक खुलासा !

दिल्ली : खरा पंचनामा 

संपूर्ण देशासाठी ग्राह्य मानली जाणारी वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'NEET-UG' यंदा पेपरफुटीच्या कचाट्यात सापडली आहे. 3 मे रोजी ही परीक्षा पार पडली होती. परंतू काही दिवसातच पेपरफुटीचं प्रकरण समोर आलं. अशातच आता सरकारने पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच देशातील 23 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा तयारी करावी लागतीये. अशातच आता CBI ने या प्रकरणी तपास केला असून कोर्टात धक्कादायक माहिती दिली आहे.

पुण्याच्या मॉर्डल कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मनिषा मांढरे या शिक्षिकेला सीबीआयने अटक केली असून तिची कसून चौकशी सुरू आहे. अशातच कोर्टात सीबीआयने मोठी माहिती दिली. मनीषा मांढरे या वनस्पतिशास्त्र (बॉटनी) आणि प्राणिशास्त्र (जूलॉजी) विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे भाषांतर करणाऱ्या तज्ज्ञ होत्या. त्यामुळे त्यांना मूळ प्रश्नपत्रिकांपर्यंत थेट प्रवेश होता. याच अधिकाराचा गैरफायदा घेत त्यांनी संपूर्ण यंत्रणेला फसविल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

सीबीआयने पुण्यातून ताब्यात घेतलेले पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे हे दोन्ही प्राध्यापक NTA च्या पेपर सेटिंग कमिटीचे सदस्य आहेत. प्रल्हाद कुलकर्णी हा केमिस्ट्री तर मनीषा मांढरे या बायोलॉजीचा पेपर सेट करत होत्या. या तिघांनी मिळून पेपर फोडला. जयपूरच्या प्रिंटिंग एजन्सीमधून लीक झालेला हा पेपर नाशिक आणि लातूर मार्गे देशभरात पसरला, असा आरोप सीबीआयने केला आहे.

मनीषा मांढरे या या प्रकरणात एकट्या नव्हत्या. त्यांनी पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांच्यासोबत संगनमत करून प्रश्नपत्रिका लीक करण्याचा कट रचला होता, अशी माहिती समोर आली आहे. मंढारे यांनीच मुळ प्रश्नपत्रिका शुभम नावाच्या अन्य आरोपीकडे सुपूर्द केली तिथून त्याने आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण देशात प्रश्नपत्रिका फिरवली, असा आरोप आहे.

दरम्यान, आता पोलिसांनी विविध राज्यात छापेमारी सुरू केली असून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मनीषा मंधारे यांना देशातील विविध ठिकाणी नेऊन चौकशी करणे आवश्यक आहे. यासाठीच 14 दिवसांची कोठडी मागण्यात आली होती. कोर्टाने याला मंजुरी दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.