Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकरांची चौकशी कोण करणार?अंजली दमानिया यांचा पोलीस महासंचालकांना सवाल

सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकरांची चौकशी कोण करणार?
अंजली दमानिया यांचा पोलीस महासंचालकांना सवाल 

नाशिक : खरा पंचनामा 

भोंदू अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. अनेकांना कोट्यवधींना गंडा घातला. तर अनेकांच्या जमिनी हडपल्या. याप्रकरणात राजकीय कनेक्शन उघड झाल्यानंतर काही नेत्यांवर मोठे आरोप झाले.

शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून काहींचे थेट खरातशी लागेबंध समोर आले. त्यांच्या चौकशीची सातत्याने मागणी होत होती. भोंदू अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आज एसआयटीसमोर हजर होत आहेत. त्या नाशिक येथे पोहचल्या आहेत. थोड्याच वेळात त्या वकिलासोबत एसआयटीसमोर हजर होतील. तर त्याचवेळी अंजली दमानियायांनी अजून एक मोठी मागणी केली आहे.

माध्यमांवर बघतो त्यापेक्षा खरात प्रकरणाची व्यापती मोठी आहे. या प्रकरणात केवळ ९ महिलांची चौकशी होणार असं पोलिसांनी सांगितलं होतं. त्यानंतर पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं. मनी लॉण्ड्रींग, चाकणकरांची चौकशी कोण करणार असा सवाल दमानियांनी विचारला. तर त्याचवेळी सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकरांची चौकशी कोण करणार असा सवाल पत्राद्वारे विचारल्याची माहिती त्यांनी दिली.

तटकरे, शिंदे, आणि केसरकरांची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाचा राजकीय वापर नको, खरं जनतेसमोर येणं गरजेचं असे मत त्यांनी व्यक्त केले. तर काल रात्रीही मोठी माहिती माझ्याकडे आली आहे. ही माहिती आपण एसआयटीला दिल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे आता दमानिया याप्रकरणात कोणता गौप्यस्फोट करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. त्याचवेळी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुनील तटकरेंनी रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. सुनील तटकरे रुपाली चाकणकरांच्या पाठिशी खंबीर उभे होते, असा आरोप दमानिया यांनी केला.

एकट्या रुपाली चाकणकरांची चौकशी व्हावी अशी विनंती एसआयटी आणि तर एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे केल्याची माहिती दमानिया यांनी दिली. त्यांच्या व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे. रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या हे सुद्धा समोर आलं पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.