पोलीस दलातील फेरबदल चौथ्या दिवशीही सुरूच!
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाकडून गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्र पोलीस दलात फेरबदल सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. 15 मे रोजी पोलीस सेवेतील (IPS) 53 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले होते.
यानंतर आज (19 मे) सलग चौथ्या दिवशी पुन्हा एकदा अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पोलीस दलात फेरबदलांची मालिका अद्यापही सुरूच असल्याचे चित्र आहे.
आज जारी करण्यात आलेल्या नवीन आदेशांनुसार, यापूर्वी मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी पथकात (ANC) कार्यरत असलेले नवनाथ धवळे यांची आता मुंबई गुन्हे शाखेचे (शोध पथक-1) नवे पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, पुढील आदेश येईपर्यंत त्यांच्याकडे अमली पदार्थ विरोधी पथकाचा अतिरिक्त कार्यभारही कायम राहणार आहे. दरम्यान, सायबर गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पुरुषोत्तम कराड यांची एका नवीन विभागाचे (उत्तर विभाग-1) पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी मुंबईतील विभाग-1 चे पोलीस उपायुक्त पंकज दहाणे यांची विशेष कृती दलात बदली करण्यात आली आहे. अमरावती शहराचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची मुंबईत बदली करण्यात आली असून, त्यांची एका नवीन विभागाचे (पूर्व विभाग-२) पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याउलट, मुंबई गुन्हे शाखेचे (शोध पथक-1) पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांची नवी मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. या मोठ्या फेरबदलांसोबतच, पोलीस दलात पदोन्नतीही देण्यात आली आहे. सध्या पश्चिम नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक शीतल दयानंद भालेकर यांना पदोन्नती देऊन पोलीस निरीक्षक या पदावर बढती देण्यात आली आहे. पदोन्नतीनंतरही, त्या पश्चिम नियंत्रण कक्षातच कार्यरत राहतील.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.