Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बड्या महिला IAS अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश

बड्या महिला IAS अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश

मुंबई : खरा पंचनामा 

राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. म्हाडाच्या जॉईंट सीईओ वंदना सूर्यवंशी यांच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आदेश जारी केले असून, २०१४ मधील एका दस्त नोंदणी प्रकरणात महसूल विभागाला मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

४९ कोटी रुपयांच्या महसूल नुकसानीचा आरोप माहितीनुसार, तत्कालीन मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना वंदना सूर्यवंशी यांनी संपत्तीचे चुकीचे मूल्यांकन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शासनाला तब्बल ४९ कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्काचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात तत्कालीन सहाय्यक नगररचनाकार प्रकाश मुळे यांचीही विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. दोन्ही अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे.

या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर, शिस्तभंग, गैरवर्तन आणि पदाचा गैरवापर केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. संपत्तीचे मूल्यांकन करताना नियमांचे पालन झाले का, याची चौकशी विभागीय स्तरावर केली जाणार आहे.

महसूल विभागाने पुढील दहा दिवसांत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.

२०१४ साली झालेल्या दस्त नोंदणी व्यवहारातील अनियमितता आता पुन्हा चर्चेत आली आहे. शासनाच्या महसुलाचे नुकसान झाल्याच्या आरोपांमुळे या प्रकरणाकडे प्रशासन आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.