Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिस महानिरीक्षकांवरच गंभीर गुन्हा दाखल; बलात्कार केल्याचा महिलेचा आरोप

पोलिस महानिरीक्षकांवरच गंभीर गुन्हा दाखल; बलात्कार केल्याचा महिलेचा आरोप

जयपूर : खरा पंचनामा 

राजस्थान पोलिस महानिरीक्षक (मानवाधिकार) किशन सहाय यांच्यावर महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशन सहाय हे सध्या मानवाधिकार विभागात आयजी पदावर कार्यरत आहेत. पोलिस महानिरीक्षकाने बलात्कार आणि हल्ला केला तसंच जीवे मारण्याची देखील धमकी दिली असल्याचे ५३ वर्षीय महिलेने आपल्या तक्रारीत सांगितले आहे.

पीडित महिलेने पोलिसांकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीच्या आधारे मालवीय नगर पोलिस ठाण्यात आयजी किशन सहाय यांच्याविरोधात गन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा सध्या पोलिस तपास करत आहेत. पोलिस महानिरीक्षकांवर महिलेने केलेल्या या गंभीर आरोपामुळे राजस्थान पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

पीडित महिलेने आयजींवर आरोप केला की, त्यांनी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर शासकीय निवासस्थानी बोलावून जबरदस्तीने बलात्कार केला. तिने विरोध केल्यानंतर त्यांनी तिला मारहाण केली. कोणाकडे तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी त्यांनी धमकी दिली होती. महिलेच्या या तक्रारीची दखल घेत आयजींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यावर बलात्काराच्या आरोपामुळे आणि गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. हे प्रककरण गांभीर्याने घेतलं जात असून त्याच्या प्रत्येक बाजूने तपास केला जात आहे. पोलिस सर्व बाबींची कसून चौकशी करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील खरी परिस्थिती समोर येईल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.