'बेपत्ता मुलीचा शोध घेऊ शकत नाही, कारण गाडीत डिझेल नाही'
पोलिसांच्या अजब उत्तराने नातेवाईकांना धक्का
नागपूर : खरा पंचनामा
शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मुलगी बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली. मुलगी हरवल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, शोधमोहीम सुरू करण्याबाबत पोलिसांकडून गाडीत डिझेल नाही, त्यामुळे शोधासाठी जाता येत नाही, असे उत्तर मिळाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असताना पोलिसांकडून तत्पर कारवाई अपेक्षित होती. मात्र, मुलगी २१ वर्षांची असल्याने ती तिचे निर्णय घेऊ शकते, तिला कुठे जायचे ते जाऊशकते. असे सांगून वाहनासाठी डिझेल नसल्याचे कारणदेण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. "ही केवळ निष्काळजीपणा आहे की संपूर्ण यंत्रणेचे अपयश ?" असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस प्रशासनावर तिवृ संताप व्यक्त केला. पोलिसांकडून मोठ्या घोषणा केल्या जातात, परंतु प्रत्यक्षात शोधासाठी आवश्यक मूलभूत सुविधांचाच अभाव असेल तर नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हा धक्कादायक प्रकार समोर येताच माजी विरोधी पक्ष नेते आणि विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांवी आपला सोशल मीडिया हँडलर एक्सवर नाराजी व्यक्त करत गृहमंत्र्यांच्या कारभारावर टीका केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.