Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीच्या खेळाडूंची क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरीनिव शेठ उपविजेता, तर भार्गवी भोसले हिला राज्य शिष्यवृत्ती

सांगलीच्या खेळाडूंची क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी
निव शेठ उपविजेता, तर भार्गवी भोसले हिला राज्य शिष्यवृत्ती

सांगली : खरा पंचनामा 

मुंबई येथे पार पडलेल्या १४ वर्षांखालील अखिल भारतीय लॉन टेनिस स्पर्धेत सांगलीच्या निव शेठ याने आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही गटांत उपविजेतेपद (Runner-up) पटकावले आहे.
तर सांगलीची उदयोन्मुख खेळाडू भार्गवी भोसले हिला तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मानाच्या राज्य शिष्यवृत्ती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्तरावरही सांगलीच्या मार्गदर्शनाचा डंका
केवळ वैयक्तिक कामगिरीतच नव्हे, तर सांघिक पातळीवरही सांगलीच्या क्रीडा मार्गदर्शकांनी आपली मोहोर उमटवली आहे. प्रसिद्ध क्रीडा प्रशिक्षक रवींद्र कदम यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या शालेय संघाने राष्ट्रीय स्पर्धेत अप्रतिम खेळ करत उपविजेतेपद मिळवले.

निव शेठ याचे यश, भार्गवी भोसले हिला मिळालेला राज्य पुरस्कार आणि प्रशिक्षक रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या संघाने मारलेली भरारी, यामुळे सांगलीच्या क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. या सर्व खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, भविष्यातील त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.