Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सुवेंदू अधिकारींच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब उपमुख्यमंत्री पदासाठी 'ही' नावं चर्चेत

सुवेंदू अधिकारींच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब 
उपमुख्यमंत्री पदासाठी 'ही' नावं चर्चेत

कोलकाता : खरा पंचनामा 

पाच राज्यांतील निवडणुकांसोबतच पश्चिम बंगालमध्ये देखील 293 जागांसाठी निवडणूक आणि निकाल जाहीर झाले. त्यामध्ये संपूर्ण चित्र एखाद्या थरारक चित्रपटाच्या क्लायमॅक्ससारखे वाटत होतंकधी भाजपची भगवा लाट आघाडी घेताना दिसली तर कधी ममता बॅनर्जी यांचा खेळा पुन्हा त्यांना शर्यतीत पुढे आणताना दिसला मात्र बंगालमध्ये भाजपचाच विजय झाला आहे. त्यामुळे आता भाजपमधील मुख्यमंत्रीपदासाठीच्या नावांची चर्चा झाली. त्यात पश्चिम बंगालमधील भाजपचे फायर ब्रँड नेते सुवेंदू अधिकारी यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र आता यामध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी काही नावांची चर्चा सुरू झाली आहे.

पश्चिम बंगाल निवडणुकांदरम्यानच अमित शाह यांनी स्पष्ट केले होते की, राज्याचा मुख्यमंत्री हा बंगालमधीलच, बंगाली भाषा बोलणारा आणि बंगालच्या मातीतला सुपुत्र असेल. त्यामुळे अनेक नावांची चर्चा सुरू असली तरी शुभेंदू अधिकारी यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. अमित शाह निरीक्षक म्हणून तर मोहन चरण माझी सह-निरीक्षक म्हणून कोलकात्यात दाखल झाले आहेत. दुपारी भाजप आमदार दलाची बैठक होणार असून त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्रीपदाच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.l

सूत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी शुभेंदू अधिकारी यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. यावेळी राज्यात दोन उपमुख्यमंत्री नेमले जाऊ शकतात, अशीही चर्चा आहे. त्यापैकी एक महिला उपमुख्यमंत्री असू शकते आणि त्यासाठी अग्निमित्रा पॉल यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. दुसरे उपमुख्यमंत्री उत्तर बंगालमधून असू शकतात, ज्यासाठी निशीथ प्रमाणिक यांचे नाव चर्चेत आहे. याशिवाय, आदिवासी समाजातील एका नेत्यालाही उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, या सर्व नावांबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

गेल्या काही महिन्यांत ज्या-ज्या राज्यांत भाजपची सत्ता आली, तिथे मुख्यमंत्रीसोबत दोन उपमुख्यमंत्री नेमण्याचा फॉर्म्युला पक्षाने वापरला आहे. 2023 मध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान, तर 2024 मध्ये महाराष्ट्र आणि 2025 मध्ये बिहारमध्येही भाजपने हाच प्रयोग केला होता. आता पश्चिम बंगालमध्येही भाजप हाच फॉर्म्युला राबवू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बंगालची गुंतागुंतीची राजकीय परिस्थिती पाहता अमित शाह आणि मोहन चरण माझी हे एकाच वेळी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांची नावे जाहीर करू शकतात, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. मात्र, अंतिम निर्णय आमदार दलाच्या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.