Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आरटीओ अधिकारी किरण बिडकर निलंबितस्कूलबस अपघातानंतर राज्य सरकारची मोठी कारवाई

आरटीओ अधिकारी किरण बिडकर निलंबित
स्कूलबस अपघातानंतर राज्य सरकारची मोठी कारवाई

नागपूर : खरा पंचनामा 

नागपुरातील कोरडी रोडवर मलकापूर पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या स्कूलबस व स्कूलव्हॅनच्या अपघातात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत नागपूर शहरातील प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) किरण बिडकर यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले. शासनाने याबाबत आदेश जारी केले. या कारवाईमुळे आरटीओ अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

नागपुरात १२ सप्टेंबर २०२५ ला एमएच-३१-ईएम-००३६ या क्रमांकाची स्कूलव्हॅन व एमएच-३१-एफसी-१९३१ या क्रमांकाच्या स्कूलबसमध्ये समोरासमोर धडक झाली. यात विद्यार्थ्यासह दोन जण ठार तर आठपेक्षा अधिक विद्यार्थी जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला. स्कूलव्हॅनला फिटनेस प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले. या अपघात प्रकरणी मानकापूर पोलिसांनी भवन्स स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत कामकाज सांभाळणारा वाहतूक प्रमुख, ओरिएंटल नागपूर बैतुल हायवे लिमिटेड पांढुर्णाचा कंत्राटदार राजनेशकुमार दशरथकुमार सिंग, कंपनीचा स्थानिक बांधकाम प्रमुख व जबाबदार राव, विजय हेमंतराव मोरे, मृतक व्हॅनचालक ऋतिक घनश्याम कनोजिया व स्कूलव्हॅनमालक राजेश यादव या सहा जणांविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता.

सदर अपघाताबाबत उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्नही उपस्थित केला होता. त्यावेळी किरण बिडकर यांना निलंबित करण्यात येणार असल्याची घोषणा सभागृहात परिवहन माणत्यांनी केली होती. याप्रकरणात संथगतीने कारवाई होत असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर शासनाकडून हालचाल सुरू झाली. बिडकर हे जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्याचे निलंबन आदेशात म्हटले आहे.

निलंबन कालावधीत किरण बिडकर यांचे मुख्यालय मुंबईतील परिवहन आयुक्त कार्यालय राहील आणि ते पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू शकणार नाहीत, असेही आदेशात नमूद आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.