Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

​जनावरांच्या बाजारात गोवंश संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा'मुस्लिम गोरक्षक दलाचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

​जनावरांच्या बाजारात गोवंश संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा
'मुस्लिम गोरक्षक दलाचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

​सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्यातील जनावरांच्या बाजारांमध्ये गोवंश संरक्षण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी आणि बेकायदेशीर पशुधनाची खरेदी-विक्री रोखली जावी, या मागणीसाठी 'मुस्लिम गोरक्षक दल सांगली मिरज कुपवाड आणि समस्त मुस्लिम समाज समितीच्यावतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

​निवेदनात प्रामुख्याने खालील मुद्दे मांडण्यात आले आहेत. कायदेशीर मार्गाने काम: मुस्लिम समाज कायद्याचा आदर करणारा असून, गोवंश संरक्षणासाठी पूर्णपणे कायदेशीर व शांततामय मार्गाने काम करण्यास कटिबद्ध आहे.

काही ठिकाणी तथाकथित व बोगस गोरक्षकांकडून मुस्लिम समाजाला लक्ष्य करून सामान्य नागरिकांवर अन्याय, मारहाण व दहशतीचे प्रकार केले जात आहेत. यामुळे सामाजिक सलोखा बिघडत असून अशा प्रवृत्तींना आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महिनाभर आधीपासूनच जनावरांच्या बाजारात गोवंश खरेदी-विक्रीस बंदी घालण्यात यावी. तसेच २८ मे २०२६ रोजी मिरज येथे भरणाऱ्या जनावरांच्या बाजारातही ही बंदी लागू करावी.

बेकायदेशीर खरेदी-विक्रीतून वाचवण्यात आलेल्या गोवंश जनावरांना ताब्यात घेऊन त्यांचे संगोपन, देखभाल व संरक्षण करण्याची योजनाही समितीमार्फत राबवण्यात येणार आहे.
​प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली, कायदा हातात न घेता सामाजिक सलोखा राखत ही मोहीम राबवली जाईल, असा विश्वास समितीचे आसिफ बावा आणि इतर सदस्यांनी या निवेदनाद्वारे व्यक्त केला आहे. निवेदनावर युनूस महात, लालू मिस्त्री, समीर पन्हाळकर यांच्या सह्या आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.