Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

साध्या वेशात उभ्या राहिलेल्या 'लेडी सिंघम'ला छेडण्यासाठी आले ४० तरुणमहिलांबाबतचं वेदनादायी वास्तव कसं आणलं समोर ?

साध्या वेशात उभ्या राहिलेल्या 'लेडी सिंघम'ला छेडण्यासाठी आले ४० तरुण
महिलांबाबतचं वेदनादायी वास्तव कसं आणलं समोर ?

हैदराबाद : खरा पंचनामा 

महिलांच्या सुरक्षेचे दावे अनेकदा कागदावरच राहतात, पण ते प्रत्यक्ष जमिनीवर किती खरे आहेत हे तपासण्यासाठी हैदराबादमधील मलकाजगिरीच्या पोलीस आयुक्त सुमती यांनी एक अत्यंत अनोखा प्रयोग केला.

साध्या वेशात, सुरक्षारक्षकांशिवाय मध्यरात्री रस्त्यावर पोलीस आयुक्त सुमती उभा राहिल्या. अवघ्या तीन तासांत ४० पुरुषांनी गाठले. या प्रकारामुळे शहरात महिला किती असुरक्षित आहेत, याचे भयावह वास्तव समोर आले आहे.

नुकताच पदभार स्वीकारलेल्या पोलीस आयुक्त सुमती यांनी शहरातील ग्राउंड रिअॅलिटी तपासण्याचे ठरवले. मध्यरात्री १२:३० ते पहाटे ३:३० या वेळेत त्या एका बस स्थानकावर सामान्य महिलेसारख्या उभ्या राहिल्या. त्यांच्या आसपास कोणताही पोलीस बंदोबस्त नव्हता. केवळ तीन तासांच्या या काळात तब्बल ४० पुरुषांनी त्यांना गाठून त्रास देण्याचा प्रयत्न केला.

यात धक्कादायक बाब म्हणजे, हे पुरुष केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीचे नव्हते, तर त्यात शिकलेले तरुण, विद्यार्थी आणि नामांकित कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारीही होते. यातील अनेक जण दारूच्या नशेत होते, तर काही जणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचा संशय आहे. समोर उभी असलेली स्त्री ही एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे, याची कल्पनाही त्यांना नव्हती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.