Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सहायक पोलीस निरीक्षक पत्नीचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केल्याच्या रागामधून कृत्य

सहायक पोलीस निरीक्षक पत्नीचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न 
कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केल्याच्या रागामधून कृत्य

पुणे : खरा पंचनामा 

कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेल्या घटस्फोटाच्या केसचा राग मनात धरून पतीने सहायक पोलीस निरीक्षक असलेल्या पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केला. आरोपी पतीने हातात हँडग्लोव्हज घालून घरात प्रवेश करीत "आज तुला संपवूनच टाकतो," असे म्हणत पत्नीच्या गळ्यातील ओढणीने तिचा गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश माधव बेरी (वय ३८, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी ३६ वर्षीय महिला सहायक पोलीस निरीक्षकाने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २७ मे २०२६ रोजी सकाळी घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला अधिकारी खडकी पोलीस वसाहतीमध्ये राहण्यास आहे. फिर्यादी आणि आरोपी योगेश बेरी यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते.

आरोपी योगेश हा फिर्यादीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे आणि तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता. या जाचाला कंटाळून प्रेरणा यांनी पुणे कौटुंबिक न्यायालयात योगेशविरुद्ध घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे.

या दाखल केलेल्या खटल्याचा तीव्र राग आरोपी योगेशच्या मनात होता. २७ मे रोजी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास प्रेरणा या आपल्या घरात असताना आरोपी योगेश तिथे आला. पुरावा नष्ट करण्याच्या आणि ओळख लपवण्याच्या हेतूने त्याने हातात हँडग्लोव्हज घातले होते. घरात प्रवेश करताच त्याने सोबत आणलेली राख अचानक प्रेरणा यांच्या डोळ्यात फेकली, जेणेकरून त्यांना काही दिसू नये.

डोळ्यात राख गेल्याने प्रेरणा काही समजण्याच्या आत आरोपीने, "तू बरेच दिवस झाले बचावली आहेस, आज तुला संपवूनच टाकतो," असे ओरडत त्यांच्या अंगावर झेप घेतली. त्याने प्रेरणा यांच्या गळ्यातील ओढणी पकडली आणि त्यांना स्वतःकडे जोरात ओढले. त्यानंतर ओढणीचा फास तयार करून त्याने प्रेरणा यांचा गळा अत्यंत ताकदीने आवळण्यास सुरुवात केली.

प्रेरणा यांनी आरडाओरडा करून स्वतःचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. हा प्राणघातक हल्ला केल्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. घटनेनंतर गंभीर अवस्थेत असलेल्या फिर्यादीने खडकी पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी दाखवत आरोपी पती योगेश बेरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.