Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आदिती तटकरेंचं मंत्रीपद धोक्यात?त्या नेत्याचं नाव घेत रोहित पवार यांचा तो मोठा दावा

आदिती तटकरेंचं मंत्रीपद धोक्यात?
त्या नेत्याचं नाव घेत रोहित पवार यांचा तो मोठा दावा

मुंबई : खरा पंचनामा 

राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसफूस शिगेला पोहचल्याचा दावा करण्यात येत आहे. आमदार रोहित पवार हे सातत्याने अजितदादांच्या गोटातील घडामोडी आणि कानगोष्टी चव्हाट्यावर आणत आहेत. 

आता ही त्यांनी असाच एका मोठा दावा केला आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना साईड लाईन केल्याची बातमी समोर आली. तर लागलीच या बातमीचे राष्ट्रवादीतून खंडणही करण्यात आले. सुनील तटकरे अथवा प्रफुल पटेल यांनी याविषयावर कोणतेही भाष्य करणे अद्याप टाळलेले आहे. पण पक्षातंर्गत काही तरी शिजतंय असा काहींचा दावा आहे. त्यात आमदार रोहित पवार यांच्या दाव्याने नवीन भर घातली आहे.

सध्या राष्ट्रवादीतील दोन नेत्यांमधील कथित ऑडिओ क्लिप वादाच्या केंद्रस्थानी असल्याचे बोलले जात आहे. त्यावर आमदार रोहित पवार यांनी मत व्यक्त केलं आहे. दादा गेल्यानंतर १२ व्या दिवशी पत्रावर सही केली गेली, ती सही कोणाची होती. एका ऑडिओमध्ये या दोघांमधील एक नेता दादांवर खालच्या भाषेत बोलत होता. ही ऑडिओ क्लिप दुसरं पत्र जाण्याअगोदर सुनेत्राताईंना कुणीतरी ऐकवली. ज्या व्यक्तीकडे ऑडिओ क्लिप आहेत त्याच्याशी माझं फोनवरुन संभाषणं झालं. तो व्यक्ती मला ही ऑडिओ क्लिप व्हॉट्सअपवर पाठवत नाही. पण सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी ती ऐकली आहे. अनुभवी नेत्यांना किंवा लोकांना सहजासहजी कुणी डावलत नसतं. खरंच हे पक्षाला प्रामाणिक असते तर त्यांचं पद का घालवलं असतं. या दोघांना डावलतायत हे आपल्याला पाहायला मिळतंय. जो संदेश जायला पाहिजे तो लोकांपर्यंत गेला आहे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. हा दावा तटकरे आणि पटेलांविषयी आहे की इतर कुणाविषयी ते संदर्भ देत आहेत हे जाणकारांना अचूक कळलं आहे.

अजितदादा ऐकत कुणाचं नव्हते, ते फक्त कार्यकर्ते पदाधिकारी आणि महत्त्वाच्या लोकांचं ऐकायचे असे रोहित पवार म्हणाले. अजित पवारांसंदर्भात त्या ऑडिओ क्लिपमध्ये फार खालच्या लेव्हला जाऊन शब्द वापरले गेले. पार्थ आणि काकींनी पूर्ण क्लिप ऐकली असं आम्हाला समजलं तेव्हा हा प्रश्न त्यांना विचारा, असे रोहित पवार म्हणाले.

सिल्व्हर ओकवर शरद पवार यांना कुणीही भेटू शकतं. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे शरद पवार यांनी सांगितले आहे. तर आदिती तटकरेंचं पद घालून सुनिल शेळकेंना पद दिलं जाऊ शकतं. राज्यमंत्र्याला मंत्रिपद दिलं जाऊ शकतं, असा मोठा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पुढच्या काही महिन्यात काही होऊ शकतं, असे ते म्हणाले.

अजितदादा धाडसी नेते होते. दादा विरोधीपक्षनेते होणार होते का? दादांची आणि आमची चर्चा बोलून फायदा नाही. विलिनीकरण नक्की होणार होतं. दोन्ही पक्ष एकत्रित राहिले तर दावेदारी करू शकले असते. भाजपाची साथ सोडून बाहेर येत असतील तर होऊ शकतं, नसेल येणार तर विलिनीकरण नाही होऊ शकत, असे रोहित पवार म्हणाले. दादाच्या अपघाताविषयी मनात शंका नसती तर आम्ही पाठपुरावा केला नसता. पारदर्शक पद्धतीने तपास होणं महत्त्वाचे आहे, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.