अखेर केंद्र सरकारला आली 'नीट' जाग, जिथून पेपर झाले शेअर, 'ते' दार करणार बंद !
नवी दिल्ली : खरा पंचनामा
नीट पेपर लिक प्रकरणामुळे रोज नव नवीन खुलासे होते आहे. महाराष्ट्रात शिवराज मोटेगावकरसह ५ जणांना अटक केली आहे. आता केंद्रीय पातळीवरही कडक कारवाई केली जाणार आहे. NEET-UG पुनर्परिक्षा जूनमध्ये होणार आहे.
पण, या परिक्षेचाही पेपर फोडण्यासाठी पेपरफोडे सज्ज झाले असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच केंद्र सरकार पूर्णपणे अलर्ट मोडमध्ये आलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांसोबत उच्चस्तरीय बैठक घेत परिक्षा व्यवस्थितीत पार पडेल, यासाठी हवं ते करा, असे निर्देशच दिले आहे.
नीट पेपर लिक प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत शिक्षण मंत्रालय आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. परीक्षेपूर्वी कोणतीही गडबड होऊ नये यासाठी सुरक्षा व्यवस्थेचा आणि संभाव्य त्रुटींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
दरम्यान, मेटा गुगल आणि टेलिग्राम या सोशल मीडिया कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत फेक पेपर लीक, दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्स आणि अफवा पसरवणाऱ्या टेलिग्राम चॅनल्सबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. परीक्षेपूर्वी काही चॅनल्स अचानक सक्रिय होत विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, काही संशयास्पद चॅनल्स मर्यादित मोबाईल नंबरच्या माध्यमातून एकत्रित पद्धतीने चालवले जात आहेत. यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी अशा चॅनल्सची ओळख पटवून त्यांना तातडीने ब्लॉक आणि हटवण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांना अफवांपासून दूर ठेवणं आणि परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास कायम राखणं ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.