आरोपींना घेऊन निघालेल्या भरधाव पोलीस व्हॅनने तीन वाहनांना उडवले
पंढरपूर : खरा पंचनामा
न्यायालयात हजर करण्यासाठी 9 आरोपींना घेऊन निघालेल्या भरधाव पोलीस व्हॅनचालकाचा ताबा सुटल्याने त्याने समोरून येणाऱ्या तीन वाहनांना धडक दिली. पंढरपूर-मंगळवेढा मार्गावरील एकलासपूर येथे घडलेल्या या अपघातात दुचाकीकरील भाऊ-बहीण गंभीर जखमी झाले आहेत.
यशराज लहू उन्हाळे (कय 21) आणि प्रगती लहू उन्हाळे (कय 19, रा. उन्हाळे कस्ती, डोंगरगाव, ता. मंगळवेढा) अशी अपघातात जखमी झालेल्या भावंडांची नावे आहेत. दोघांकर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघातात पोलीस व्हॅनचे चालक हवालदार शिकानंद स्वामी यांनाही गंभीर दुखापत झाली आहे.
पंढरपूर उपकारागृह बंद असल्याने विविध गुह्यांतील आरोपींना सोलापूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात येते. न्यायालयीन तारखेनुसार नऊ आरोपींना घेऊन पोलीस मिनी बस सोलापूरहून पंढरपूरकडे निघाली होती. व्हॅनमध्ये 7 ते 9 पोलीस कर्मचारी होते. दुपारी एकलासपूर गावाजवळ व्हॅनचालकाचे नियंत्रण सुटले. भरधाक व्हॅनने समोरून येणाऱ्या दुचाकीसह दोन मोटारींना धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील भाऊ-बहीण गंभीर जखमी झाले, तर पोलीस व्हॅनसह दोन मोटारींचे नुकसान झाले. तीन वाहनांना धडक दिल्याने पोलीस व्हॅनचे टायर फुटले आणि ती झाडावर जाऊन आदळली.
दरम्यान, 'स्वेरी' कॉलेजची बस बोलावून सर्व आरोपींना वेळेत न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुन्हा सोलापूर कारागृहात रवानगी करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.