Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठ्या घडामोडी, पुण्यात गुप्त बैठक?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठ्या घडामोडी, पुण्यात गुप्त बैठक?

पुणे : खरा पंचनामा 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या घडामोडी घडत आहे. शरद पवार अॅक्शनमध्ये आले असून पक्षातील नेत्यांना त्यांना अॅक्टिव्ह केल्याची माहिती आहे. पक्षातील नेत्यांची नुकतीच पुण्यात बैठक झाल्याचे वृत्त आहे.

या बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांचा फोटो देखील समोर आला आहे. मात्र, मात्र ही बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे समोर आले नाही.

नामांकित हॉटेलमध्ये ही बैठक पार पडलेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते अशी माहिती आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत मिळत आहेत.

शरद पवार हे पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी विविध राजकीय प्रश्नांची उत्तरे दिली होती. माजी मंत्री प्रफुल पटेलयांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळले आहे, त्याबाबत पवार म्हणाले, मला त्या गोष्टीवर भाष्य करायचे काही कारण नाही. तो दुसरा पक्ष आहे, त्यांचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा आहे. मात्र, पटेल, तटकरेंमध्ये काय कर्तृत्व आहे, याची मला कल्पना आहे.

शरद पवार यांची सुनील तटकरे यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. या भेटीनंतर तटकरेंनी ही राजकीय भेट नसल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, तटकरे यांच्यासोबतच प्रफुल पटेल यांनी देखील भेट घेतल्याचे वृत्त आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.