बहुमत जुळवताना दमछाक, पण विश्वासमत ठरावात १४४ मते; DMKचं वॉकआऊट
चेन्नई : खरा पंचनामा
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यानं त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या टीव्हीकेनं काँग्रेसच्या पाठिंब्यानं सत्तास्थापनेसाठी हालचाली केल्या. सुरुवातीला राज्यपालांनी बहुमताचा आकडा मागितला होता. शेवटी टीव्हीकेनं काँग्रेस आणि इतर लहान पक्षांच्या मदतीने सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर शपथविधीही झाला. आता विधानसभेत विजयच्या टीव्हीके पक्षानं बहुमतही सिद्ध केलंय.
बुधवारी तामिळनाडु विधानसभेत विश्वासमताचा ठराव सादर करण्यात आला होता. यात टीव्हीकेच्या आघाडी सरकारला तब्बल १४४ आमदारांचे समर्थन मिळाले. तामिळनाडु विधानसभेत २३४ सदस्य असून बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला ११८ जणांच्या पाठिंब्याची आवश्यकता होता. बहुमत सिद्ध करतानाही सभागृहात नाट्यमय घडामोडी घडल्या. डीएमकेनं मतदानाला नकार देत विधानसभेतून वॉकआऊट केलं.
फ्लोअर टेस्टमध्ये विजय यांच्या सरकारला काँग्रेस, सीपीआय, सीपीआयएम, व्हीसीके आणि आययूएमएलने पाठिंबा दिलाय. तर भाजप आणि अनबुमणि रामदोस यांच्या नेतृत्वाखालील पीएमकेने तटस्थ भूमिका घेतली. एआयडीएमकेच्या बंडखोर गटाने विजय यांच्या पाठिंब्याची घोषणा केल्यानं मोठा गदारोळ उडाला. एसपी वेलुमणि यांच्या नेतृत्वाखाली ४७ पैकी ३० आमदारांनी विजय यांना पाठिंबा दिला. यापैकी किमान २५ आमदारांनी मुख्यमंत्री विजय यांच्या बाजूने मतदान केलं.
काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या पाठिंब्यानंतर विजय यांच्याकडे १२० आमदारांचा पाठिंबा होता. मात्र टीव्हीकेच्या एका आमदारावर मंगळवारी मद्रास उच्च न्यायालयाने विधानसभेत जाण्यावर निर्बंध लादले. यामुळे बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान विजय यांच्यासमोर होतं. पण बहुमताच्या परीक्षेत विजय यांनी आऊट ऑफ गुण मिळवल्याचं दिसत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.