Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आज राज ठाकरे पुन्हा ठाणे न्यायालयात हजर राहणारगेल्या सुनावणीत म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही

आज राज ठाकरे पुन्हा ठाणे न्यायालयात हजर राहणार
गेल्या सुनावणीत म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही

ठाणे : खरा पंचनामा 

मनसेप्रमुख राज ठाकरे आज रेल्वे भरती आंदोलन प्रकरणाच्या सुनावणीसाठी ठाणे न्यायालयात हजर राहणार आहेत. 2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांवर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठे नुकसान केलं होतं. याप्रकरणी ठाणे न्यायालयात सुनावणी सुरु होती.

सदर प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ज्यात "मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या" असा आरोप करत, राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना लक्ष्य केले आणि त्यांच्यात हिंसाचाराला प्रोत्साहन दिले, असे आरोप त्यात करण्यात आले होते. यामध्ये राज ठाकरे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर प्रकरणी याआधीची सुनावणी 11 डिसेंबर 2025 रोजी झाली होती. ज्यामध्ये आपल्याला गुन्हा कबूल नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोर्टासमोर सांगितले होते. त्याशिवाय आपण न्यायालयीन प्रक्रियेला संपूर्णपणे सहकार्य करू असेही राज ठाकरेंनी त्यावेळी कोर्टात म्हटलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा आज कोर्टात ही सुनावणी होणार आहे.

2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांवर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठे नुकसान केलं होतं. या हल्ल्यांच्या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ज्यात "मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या" असा आरोप करत, राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना लक्ष्य केले आणि त्यांच्यात हिंसाचाराला प्रोत्साहन दिले, असे आरोप त्यात करण्यात आले होते.

सदर प्रकरणी राज ठाकरेंसह सात इतर मनसैनिकांवर विरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली होती, पण नंतर राज ठाकरेंना दिलासा मिळाला होता. या प्रकरणी कल्याण न्यायालयात सुनावणी सुरू होती मात्र यानंतर हा गुन्हा ठाणे रेल्वे न्यायालयात वर्ग करण्यात आला. सुनावणी दरम्यान आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने राज ठाकरे सह सर्व आरोपींना न्यायालयाने समज बजावत अटक वॉरंट देखील बजावले होते. यानंतर राज ठाकरे यांच्या वकिलाने न्यायालयात अर्ज देऊन ते अटक वॉरंट देखील रह केला होता. त्यानंतर 11 डिसेंबर 2025 रोजी राज ठाकरेंनी ठाणे न्यायालयात हजर राहून मला गुन्हा मान्य नसल्याचं म्हटलं होतं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.