Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मोटेगावकरचा पाय आणखी खोलातNEET स्पेशल बॅचची होणार चौकशी

मोटेगावकरचा पाय आणखी खोलात
NEET स्पेशल बॅचची होणार चौकशी 

मुंबई : खरा पंचनामा 

देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून समोर आलेल्या शिवराज मोटेगावकरचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसतंय. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणात तो एकटाच नाही, तर अनेक हायप्रोफाईल पालक रडारवर आहेत.

मोटेगावकर हा पुण्यातील 'रेणुकाई करिअर सेंटर' (RCC) चा संचालक असून सीबीआयने त्याला या प्रकरणात अटक केली होती. मोटेगावकरने आपल्या मुलासाठी NEET पेपर विकत घेतल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, त्याच्या एका स्पेशल बॅचचा तपास केला जाणार आहे. या स्पेशल बॅचमध्ये काही निवडकच मुलं होती, असंही सूत्रांकडून समोर आलं आहे. या तपासात फक्त बॅचमधील मुलांचीच नाही, तर त्यांच्या पालकांचीही चौकशी केली जाणार असल्याचं समोर आलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.