Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पत्नीच्या खुनाचा प्रयत्न.. मुलाला मारहाण, भाजप मंत्र्यांच्या OSD वर गुन्हा दाखल

पत्नीच्या खुनाचा प्रयत्न.. मुलाला मारहाण, भाजप मंत्र्यांच्या OSD वर गुन्हा दाखल

पुणे : खरा पंचनामा 

पुण्यातील क्वीन्स गार्डन परिसरात कौटुंबिक वादातून गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न आणि मुलावर हल्ला केल्याच्या आरोपावरून एका शासकीय अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

विजय धुलचंद कारंडे असे आरोपीचे नाव आहे. त्यांच्या पत्नीने (वय 30) रविवारी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कारंडे हे मूळ नांदेड येथील समाजकल्याण विभागात कार्यरत असून सध्या मुंबईतील मंत्रालयात मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) म्हणून प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.

तक्रारीनुसार, 30 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या क्वीन्स गार्डन येथील घरात हा प्रकार घडला. पत्नीने कारंडे यांच्या मोबाईलमधील काही चॅट्सबाबत विचारणा करत पासवर्ड मागितल्याने वाद झाला. त्यातून संतापलेल्या कारंडे यांनी पत्नीला बॅटने मारहाण केली आणि तिचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

या वेळी आईला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या मुलावरही त्यांनी बॅटने हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र प्रसंगावधान राखत संबंधित महिलेनं कारंडे यांना दूर ढकलले आणि मुलासह घराबाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला.

यानंतर महिलेने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून कोरेगाव पार्क पोलिसांनी विजय कारंडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 109 (1) (खून करण्याचा प्रयत्न), 118 (1) (जाणीवपूर्वक दुखापत) आणि 351(2) (गुन्हेगारी धमकी) यांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.