मद्यधुंद टोळक्याचा पोलीस उपनिरीक्षकावर जीवघेणा हल्ला
बीड : खरा पंचनामा
बीडच्या धारूर शहराजवळ असलेल्या घाटपाटी परिसरात पोलिस उपनिरीक्षकावर झालेल्या हल्ल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मध्यरात्री पेट्रोलिंगदरम्यान कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर मद्यधुंद टोळक्याने थेट जीवघेणा हल्ला केला आहे. दगडफेकीत उपनिरीक्षक बाबासाहेब भवर थोडक्यात बचावले. धक्कादायक म्हणजे, या आरोपींमध्येच एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचा आरोप केला जातोय.
"आम्हाला कोणी काही करू शकत नाही," अशी उघड दादागिरी करत आरोपींनी पोलिसांनाच लक्ष्य केलं. या टोळक्यातील दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तीन जण फरार आहेत तर इतर आरोपी फरार आहेत. धारूर पोलिसांकडून या घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे. तर नेमकं पोलिसांवरच हल्ला होत असेल, तर सामान्य नागरिकांची सुरक्षितेचं काय हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.