तुळजापूरमध्ये 200 आणि 500 रुपये भरून व्हीआयपी पास घेणाऱ्या भाविकांचं स्वतंत्र दर्शन बंद
सर्व भाविकांना समान अंतरावरून दर्शन
तुळजापूर : खरा पंचनामा
तसेच देणगी किंवा शुल्क दर्शनाच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचेही मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी व्हीआयपी पास करणाऱ्या भाविकांना आई तुळजाभवानीच्या जवळून दर्शन व्हायचं त्यामुळे तासन्तास रांगेत उभारलेल्या सर्वसामान्य भाविकांना देवीचे दर्शन घेताना अडचणी निर्माण होत होत्या.
आता विशेष आणि सशुल्क दर्शनासाठी असलेले स्वतंत्र मार्ग बंद करण्यात आल्याने अनेक भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मंदिर संस्थानच्या म्हणण्यानुसार दर्शनासाठी कोणालाही प्राधान्य दिले जाणार नाही आणि सर्वांना एकाच रांगेतून अंतरावरून घेता येणार आहे.
नव्या व्यवस्थेमुळे दर्शन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार असून भाविकांना कमी वेळेत आणि अधिक सुलभपणे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेता यावे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.