Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रीलस्टार रोहिणी मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट ! 25 दिवसानंतर नवऱ्याचा पाय खोलात

रीलस्टार रोहिणी मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट ! 
25 दिवसानंतर नवऱ्याचा पाय खोलात

मंगळवेढा : खरा पंचनामा 

सोशल मीडियावर आपल्या रिल्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय रिल स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणाला तब्बल 25 दिवसानंतर वेगळं वळण लागलं.

रोहिणी पाराध्ये ही रील्सच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करायची आणि लोकांना पोटधरून हसवायची. पण आता तिनेच टोकाचं पाऊल उचलल्यानं अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. ज्या हॉटेलमध्ये ती रील बनवायची, त्याच हॉटेलच्या किचनमध्ये तिने आपल्या आयुष्याचा द एन्ड केला. अशातच आता पोलिसांनी तब्बल 25 दिवसानंतर मोठं पाऊल उचललं आहे.

रोहिणीच्या मृत्यूला जबाबदार धरत, तिचा पती निलेश पाराध्ये याच्यावर मंगळवेढा पोलिसांत अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती निलेश पाराध्ये याने रोहिणीचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केला होता, त्यामुळेच तिने टोकाचं पाऊल उचललं, अशी माहिती समोर येतीये. रोहिणीच्या वडिलांनी मंगळवेढा पोलीस चौकीत फिर्याद नोंदवल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण आरोपी घरगुती कारणास्तव रोहिणीला त्रास देत होता, असं तिच्या वडिलांनी आरोप केला आहे.

नवऱ्याच्या छळाला कंटाळून रोहिणीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पोलीस कारवाई या फिर्यादीच्या आधारे मंगळवेढा पोलिसांनी निलेश पाराध्येविरुद्ध BNS कलम १०८, ११५ (२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर करत आहेत.

मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी इथं रोहिणी आणि तिचा नवरा निलेश पाराध्ये या जोडीने मिळून हॉटेल ग्रामपंचायत सुरू केलं होतं. ढवरा मटन थाळी ही त्यांची स्पेशालिटी होती. रोहिणी स्वतः हॉटेलचं किचनचं काम पाहत होती. याच हॉटेलमध्ये ती रिल्स बनवून गही अल्पावधीत लोकप्रिय झाली होती. पण, कुणाला ठावून असं काही घडेल. २६ मे रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रोहिणीने स्वतःच्या स्वयंपाक खोलीत गळफास घेऊन जीवन संपवलं. रोहिणीनं गळफास घेतल्याचं लक्षात आल्यावर तिला तातडीने मंगळवेढा इथं नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वीच तिचा शेवट झाला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.