Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नीटनंतर आता आणखी एका परीक्षेचा पेपर फुटला2 लाख उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

नीटनंतर आता आणखी एका परीक्षेचा पेपर फुटला
2 लाख उमेदवारांचे भवितव्य टांगणीला 

ठाणे : खरा पंचनामा 

ठाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. TET परीक्षेचा पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. उद्या टीईटी परीक्षेचा पेपर होणार होता, मात्र हा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे.

2 लाख 26 हजार शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते, मात्र आता ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता आगामी काळात या पेपरची नवी तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. उद्या होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा प्रशासनाकडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाण्यात टीईटीचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे.

2 लाख 26 हजार शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटीचा पेपर घेण्यात येणार होता, मात्र आता पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता अधिकृत परिपत्रक जारी करून परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.