Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सर्वोच्च न्यायालयाला मिळाले 5 नवे न्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयाला मिळाले 5 नवे न्यायाधीश

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

सर्वोच्च न्यायालयाला पाच नवीन न्यायाधीश मिळालेत. सोमवारी (1 जून) केंद्र सरकारने 4 राज्यांच्या उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश तसेच सर्वोच्च न्यायालयातील एका ज्येष्ठ महिला वकिलांची देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे.

केंद्रीय कायदा व न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी स्वतः ही माहिती दिली. यापूर्वी एका अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या नुकतीच 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली होती. या 5 न्यायाधीशांच्या नियुक्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाची सध्याची न्यायाधीश संख्या आता 37 झाली आहे.

ज्येष्ठ वकील व्ही. मोहना यांनी आता इतिहास घडवला : तत्पूर्वी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने या नावांबाबतच्या शिफारसी केंद्र सरकारकडे पाठवल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्यामुळे ज्येष्ठ वकील व्ही. मोहना यांनी आता इतिहास घडवला आहे. व्ही. मोहना यांच्याशिवाय पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव सचदेवा आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अरुण पल्ली यांच्या नियुक्त्यांनाही मंजुरी मिळाली आहे.

या नियुक्त्यांकडे फक्त रिक्त पदे भरण्याची एक प्रक्रिया म्हणून पाहिले जात नाही. या न्यायिक नियुक्त्या करताना ज्येष्ठता, गुणवत्ता, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि विविधता यांसारख्या बाबींचाही विचार करण्यात आला आहे. या नियुक्त्यांची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी म्हणजेच 27 मे रोजी सुरू झाली. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने या 5 व्यक्तींना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्याची (न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची) शिफारस केली होती. ही शिफारस सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वात कॉलेजियमने जारी केलेली नियुक्त्यांची पहिली मोठी यादी मानली जाते. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये देशाचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.