Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ममता बॅनर्जीना एक मागून एक धक्के! 58 आमदारांनंतर आता 21 खासदारही गट स्थापनेच्या तयारीत

ममता बॅनर्जीना एक मागून एक धक्के! 
58 आमदारांनंतर आता 21 खासदारही गट स्थापनेच्या तयारीत 

कोलकाता : खरा पंचनामा 

पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यानंतर तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षातील अंतर्गत संघर्ष आता टोकाला गेला आहे. माजी मुख्यमंत्री व पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या हातातून पक्ष गेल्यासारखी परिस्थिती आहे. सत्तेत असताना पक्षावर वचक असलेल्या ममता बॅनर्जी यांच्याकडे 58 आमदारांनी पाठ फिरवल्यनंतर आता 21 खासदार देखील वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.

ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीत उपस्थित असतानाच पक्षातील काही खासदारांच्या गटाने गुप्त बैठक घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत राज्यसभेचा राजीनामा देणारे सुखेंदू शेखर रॉय उपस्थित होते.

ही बैठक बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडल्याचे सांगितले जात आहे. याआधी टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारांनी दिल्लीत गुप्त बैठक घेतली होती. या बैठकीत प्रसून बॅनर्जी सताबडी रॉय आणि जगदिश बसुनिया यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, हे खासदार लोकसभा अध्यक्ष दिल्लीला परतल्यानंतर सामूहिकरीत्या राजीनामे सादर करू शकतात. तसेच 20 खासदारांच्या स्वाक्षऱ्यांसह लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याचाही पर्याय त्यांच्या चर्चेत आहे. भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर पुढील राजकीय रणनीती काय असणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.