Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल३० पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल
३० पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

पूजा फडके 
पुणे : खरा पंचनामा 

प्रशासकीय निकड आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांचे (PI) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे (API) मोठे फेरबदल केले आहेत. यामध्ये जुन्नर, शिक्रापूर, शिरूर, लोणावळा, सासवड आणि जेजुरी यांसारख्या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर होऊन तसा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

पोलीस अधिकाऱ्याचे नाव व पदनाम कोठून (सध्या कार्यरत) कोठे (नवीन पदस्थापना) 
पो.नि. दत्तात्रय किसन गुंड : नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण ते जुन्नर पोलीस ठाणे 
पो.नि. कुमार रामचंद्र कदम : सासवड पोलीस ठाणे ते रांजणगाव एम.आय.डी.सी. पो.ठा. 
पो.नि. चंद्रशेखर मोहनराव यादव :  बारामती तालुका पोलीस ठाणे ते शिक्रापूर पोलीस ठाणे 
पो.नि. विनोद भगवान पाटील :  नियंत्रण कक्ष ते शिरूर पोलीस ठाणे 
पो.नि. सचिन दिनकर पाटील : नियंत्रण कक्ष (जिल्हा विशेष शाखा चार्ज) ते लोणावळा शहर पोलीस ठाणे 
पो.नि. राजेश नारायणराव रामाघरे  लोणावळा शहर पोलीस ठाणे ते हवेली पोलीस ठाणे 
पो.नि. संतोष वसंत तासगावकर : आर्थिक गुन्हे शाखा ते  यवत पोलीस ठाणे 
पो.नि. हेमंत गणपत शेडगे : दौंड पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण 
पो.नि. विजयमाला महादेव पवार : उरुळी कांचन पोलीस ठाणे ते जिल्हा विशेष शाखा (निवडणूक कक्ष) 
पो.नि. संतोष शामराव जाधव : राजगड पोलीस ठाणे ते जिल्हा वाहतूक शाखा, पुणे ग्रामीण 
पो.नि. महादेव नारायण वाघमोडे :  रांजणगाव एम.आय.डी.सी. पो.ठा.  ते आर्थिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण 
पो.नि. संदेश अरुण केंजळे : आर्थिक गुन्हे शाखा ते शिरूर पोलीस ठाणे 
पो.नि. वैशाली रावसाहेब पाटील : महिला कक्ष / भरोसा सेल ते हवेली पोलीस ठाणे 
पो.नि. नारायण शिवाजी देशमुख : एफ.आर.ओ. ते यवत पोलीस ठाणे 
स.पो.नि. नागनाथ गुरुसिद्ध पाटील :  नियंत्रण कक्ष ते वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे 
पो.नि. राजेश गणेश गवळी : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग ते भोर पोलीस ठाणे 
पो.नि. निलेश पांडुरंग माने : राजगड पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा, बारामती विभाग 
पो.नि. संतोष श्रीमंत घोळवे : सासवड पोलीस ठाणे ते टी.एम.सी., पुणे ग्रामीण 
पो.नि. रविंद्र दत्तात्रय पाटील : जेजुरी पोलीस ठाणे ते एफ.आर.ओ., पुणे ग्रामीण 
स.पो.नि. दीपक भाऊसाहेब वाघचौरे : आर्थिक गुन्हे शाखा ते जेजुरी पोलीस ठाणे 
पो.नि. नारायण विनायकराव पवार : बारामती तालुका पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष 
स.पो.नि. जीवन शांताराम मोहिते :  वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे ते इंदापूर पोलीस ठाणे
स.पो.नि. सोमनाथ पांडुरंग शेंडगे : नियंत्रण कक्ष ते भिगवण पोलीस ठाणे 
स.पो.नि. कुलदीप दत्तात्रय संकपाळ :  माळेगाव पोलीस ठाणे ते स्थानिक गुन्हे शाखा (LCB) 
पो.नि. महेश नामदेव मेश्राम : सुरक्षा शाखा ते पुणे ग्रामीण सायबर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण 
पो.नि. गोपाळ बासू पवार : जिल्हा वाहतूक शाखा, पुणे ग्रामीण ते दौंड पोलीस ठाणे 
पो.नि. महेश रामेश्वर स्वामी : वाहतूक शाखा, बारामती विभाग ते नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण 
पो.नि. दीपरतन गोरख गायकवाड :  जिल्हा विशेष शाखा ते शिक्रापूर पोलीस ठाणे 
स.पो.नि. विनोद जगन्नाथ महांगडे :  भिगवण पोलीस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण 
पो.नि. विकास जगन्नाथ भुजबळ : नियंत्रण कक्ष ते  सुरक्षा शाखा, पुणे ग्रामीण 

प्रशासकीय पारदर्शकता:
सदर बदल्या या महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम २२ न (२) व सुधारित अधिनियम २०१५ मधील तरतुदींनुसार पूर्ण कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून, जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने करण्यात आल्या आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.