काँग्रेसचे 5 राज्यसभा उमेदवार बिनविरोध विजयी!
भाजपसोबत काटे की टक्कर...
नवी दिल्ली : खरा पंचनामा
राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर होईल, अशी चर्चा होती. भाजपची तब्बल 15 राज्यांमध्ये सत्ता आहे. तर, एनडीएमधील मित्रपक्षांसोबत ते 22 राज्यांमध्ये सत्तेत आहेत. त्यामुळे ही राज्यसभा निवडणूक भाजपसाठी सोपी ठरली आहे. 10 ते 12 राज्यांमध्ये ही निवडणूक होत आहे.
18 जूनला राज्यसभा निवडणुकीसाठी 26 जागांसाठी मतदान होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजपचे 12 उमेदवार हे बिनविरोध विजयी झाले आहेत. तर, दक्षिणेतील राज्यांमध्ये कर्नाटक आणि तेलंगणामध्ये असलेल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसच पाच उमेदवार देखील बिनविरोध विजयी झाले आहेत.
कर्नाटकमधून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पवन खेरा तर, राजस्थानमधून नीरज डांगे, तमिळनाडूमधून प्रवीण चक्रवर्ती हे बिनविरोध निवडून गेले आहेत. तर, राज्यसभेतील 26 जागांपैकी 23 जागांवर बिनविरोध निवडणूक झाली आहे. एनडीएमध्ये भाजपचे 12, तर, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसेना यांचा प्रत्येक एक उमेदवार तर, टीडीपीचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
मध्यप्रदेशमधून काँग्रेसने मीनाक्षी नटराजन यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. तेलंगणामध्ये दाखल असलेला गुन्हा लपवल्याची तक्रार भाजपकडून करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला. दरम्यान, त्यांनी या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आज त्यावर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने नटराजन यांची याचिका फेटाळत त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.
राज्यसभेची निवडणूक 18 जूनला होणार आहे. या निवडणुकीत आता झारखंडमधील दोन आणि मिझोराममधील एका जागेसाठी मतदान होणार आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाची सत्ता आहे. त्यामुळे त्या दोन जागांवर काय होणार याची उत्सुकता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.