भाजपा जैन प्रकोष्ठ सांगली जिल्हा कार्यकारिणीची घोषणा
दहा हजार सभासद नोंदणीचा संकल्प
मिरज : खरा पंचनामा
भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठाच्या जिल्हा स्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी जिल्हाभर दहा हजार सभासद नोंदणी करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
भाजपा जैन प्रकोष्ठाच्या जिल्हाध्यक्षपदी महावीर पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच जिल्हा उपाध्यक्ष, सचिव, संचालक व कार्यकारिणी सदस्यांच्या निवडीची घोषणा भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग तसेच भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केली. प्रशांत गौंडाजे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली.
यावेळी सांगलीचे लोकप्रिय आमदार सुधीर गाडगीळ यांनी भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक रचना, कार्यपद्धती व पक्षीय प्रोटोकॉल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते भाजपा जैन प्रकोष्ठाच्या सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते सभासद फॉर्मचे वितरण करण्यात आले.
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी भाजपा हा पक्ष जात, धर्म न मानणारा व सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे असल्याचे सांगून जैन समाजातील जास्तीत जास्त नागरिकांना भारतीय जनता पक्षाच्या विचारांशी जोडण्याचे आवाहन केले.
प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी जैन समाजाचे संघटन व एकत्रीकरण करण्यासाठी भाजपा जैन प्रकोष्ठाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. भारतीय जनता पार्टीने जैन समाजाच्या आर्थिक विकासासाठी जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले असून समाजाला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे आणि जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून जैन समाजातील लोकांना एकत्रित येण्यासाठी वेगळे दालन तयार केले आहे. यावेळी जिल्हाभर दहा हजार सभासद नोंदणी करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वागत भाजपा जैन प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख प्रशांत गोंडाजे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशांत गोंडाजे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव पाटील, श्रेयांश पाटील यांनी केले. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष स्वाती खाडे ,भाजपा जिल्हा सरचिटणीस विशाल पवार, भाजपा मध्य मंडल अध्यक्ष राहुल नवलाई, सहसंघटक समीर पुरिया शहा, भाजपा युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष शांतिनाथ कर्वे, मिरज पंचायत समिती सदस्य मनोज पाटील, भाजपा ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष अतुल शहा, माजी उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर, माजी नगरसेवक शितल पाटील तसेच जैन समाजातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.