कोल्हापूर परीक्षेत्रातील 35 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या : 17 जणांना मुदतवाढ
गणेश वाघमोडे, निलेश बागाव पुन्हा येणार सांगलीत
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर परीक्षेत्रातील सहायक पोलीस निरीक्षकांच्या रविवारी प्रशासकीय आणि विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. 35 अधिकाऱ्यांचा बदल्या झाल्या आहेत तर 8 जणांच्या विनंती अमान्य करण्यात आल्या आहेत. 17 अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. गणेश वाघमोडे, निलेश बागाव हे अधिकारी पुन्हा सांगलीत परतले आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी बदल्यांचे आदेश दिले आहेत.
या बदल्यानुसार सांगली जिल्ह्यात चार तर कोल्हापूर जिल्ह्यात 9 अधिकारी नव्याने येणार आहेत. सातारा जिल्ह्यात आठ, पुणे ग्रामीणमध्ये सात तर सोलापूर ग्रामीणमध्ये सहा अधिकारी नव्याने येणार आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.