Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वर्षा उसगावकर, आनंद शिंदें यांनी निवडणुकीत मारली बाजी! चित्रपट महामंडळ निवडणूक

वर्षा उसगावकर, आनंद शिंदें यांनी निवडणुकीत मारली बाजी! 
चित्रपट महामंडळ निवडणूक 

कोल्हापूर : खरा पंचनामा 

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या 2026 ते 2031 या पंचवार्षिक कार्यकाळासाठी निवडणुका झाल्या. या निवडणुकीत निर्माता मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने एकहाती विजय मिळवत वर्चस्व कायम राखले आहे.

थेट निवडणुकीसाठी झालेल्या 14 जागांपैकी सर्व 14 जागांवर समर्थ पॅनेलचे उमेदवार विजयी झाले, तर विरोधी चित्रकर्मी पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही.

महामंडळाच्या एकूण 17 जागांपैकी तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित 14 जागांसाठी झालेल्या मतदानात सभासदांनी समर्थ पॅनेलच्या बाजूने स्पष्ट कौल दिला.

निर्माता विभागातून मेघराज राजेभोसले (951 मते) आणि सुनील महाजन (786 मते) विजयी झाले. दिग्दर्शक विभागातून दीपक कदम (846 मते) आणि अजित शिरोळे (756 मते) यांनी विजय मिळवला. लेखक विभागातून राज काजी (850 मते), अभिनेता विभागातून सुशांत शेलार (891 मते), छायाचित्रण विभागातून धनाजी यमकर (952 मते), नृत्य दिग्दर्शन विभागातून सुभाष नकाशे (892 मते), ध्वनिमुद्रण विभागातून शरद चव्हाण (975 मते), कला दिग्दर्शन विभागातून प्रवीण पाटील (885 मते), रंगभूषा विभागातून चैत्राली डोंगरे (998 मते), निर्मिती व्यवस्थापन विभागातून रवींद्र गावडे (910 मते), वितरण व प्रसिद्धी विभागातून गणेश गारगोटे (907 मते) आणि कामगार विभागातून विकास तोरणे (886 मते) विजयी झाले.

दरम्यान, अभिनेत्री विभागातून ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची बिनविरोध निवड झाली. तसेच संकलक विभागातून विजय खोचीकर आणि संगीत विभागातून गायक आनंद शिंदे हे बिनविरोध निवडून आले.

या निकालामुळे मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वावरील सभासदांचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून पुढील पाच वर्षांसाठी महामंडळाची धुरा समर्थ पॅनेलकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.