Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'एफडीए'ची राज्यभरात धडक कारवाई सुरूच, एका दिवसात चार कोटींचा साठा जप्त, २१ जण अटकेत

'एफडीए'ची राज्यभरात धडक कारवाई सुरूच, एका दिवसात चार कोटींचा साठा जप्त, २१ जण अटकेत 

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) १० जूनला मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला तसेच संशयित व निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांवर कारवाई केली. या मोहिमेत ३० ठिकाणी छापा टाकून सुमारे तीन कोटी ९५ लाख ४७ हजार न्य रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

या कारवाईदरम्यान २१ जणांना अटक करण्यात आली, तर १७ आस्थापने सील करण्यात आल्या. तसेच एक वाहनही जप्त करण्यात आले आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागात ही मोहीम राबविण्यात आली.

अधिकाऱ्यांनी अन्नसुरक्षा राज्यभरातील १३ आस्थापनांची तपासणी करून सुपारी, खाद्यतेल, पिण्याचे पाणी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, खवा, पेढा, तूप, गूळ आदी अन्नपदार्थांचा तीन कोटी ९४ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा एक लाख सात हजार किलोहून अधिक साठा जप्त केला. या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात १२ एफआयआर दाखल करण्यात आले. मुंबईत तीन, कोकणात १४, पुण्यात एक आणि नागपुरात दोन जणांना अटक केली.

कारवाई :
सोलापूरमध्ये रंगीत आणि निकृष्ट दर्जाची तीन कोटींची सुपारी जप्त
धुळेमध्ये भेसळयुक्त सुपारीचा ७३ लाखांचा साठा पकडला
अंधेरीत कृत्रिम रंगमिश्रित चहा पावडर जप्त

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.