Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत घरात घुसून हमाल नेत्याच्या अल्पवयीन नातवाचा डोळ्यात गोळी घालून निर्घृण खून अभयनगरच्या स्टेट बँक कॉलनीतील घटना

सांगलीत घरात घुसून हमाल नेत्याच्या अल्पवयीन नातवाचा डोळ्यात गोळी घालून निर्घृण खून 
अभयनगरच्या स्टेट बँक कॉलनीतील घटना 

सांगली : खरा पंचनामा 

शहरातील संजयनगर येथील अभयनगरच्या स्टेट बँक कॉलनीत एका अल्पवयीन मुलाचा डोळ्यात पिस्तूलाने गोळी घालून खून करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली. रेकॉर्डवरील गुन्हेगार निलेश गडदे याने तीन ते चार साथीदारांसमवेत हा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
वेदांत मारुती बंडगर (वय 15) असे मृत तरुणाचे नाव आहे. आज सायंकाळी वेदांत अभयनगरच्या स्टेट बँक कॉलनीतील घरात होता. त्यावेळी संशयित निलेश गडदे आणि त्याचे साथीदार त्याच्या घरात घुसले. निलेशने त्याच्याजवळील पिस्तूल काढून वेदांतच्या दिशेने गोळी झाडली. ती गोळी वेदांतच्या उजव्या डोळ्यात घुसली. त्यात त्याचा डोळा बाहेर आला. तेथेच तो निपचित पडला. 

गोळीबाराचा आवाज ऐकून नागरिक तेथे जमा झाले. गर्दी झाल्याचे पाहताच संशयित निलेश गडदे आणि त्याचे साथीदार पळून गेले. वेदांत हा सांगली मार्केट कमिटीचे संचालक बाळू बंडगर यांचा नातू आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, सांगलीचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिलडा, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, संजयनगरचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांच्या शोधासाठी सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, उपनिरीक्षक कुमार पाटील, एलसीबी तसेच संजयनगर पोलिसांची पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत. बाळू बंडगर यांच्याशी असलेल्या वैमनस्यातून हा खून झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.