Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुणे-सातारा हायवेवर भीषण अपघात, भरधाव ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक, वाहनाचा चक्काचूर

पुणे-सातारा हायवेवर भीषण अपघात, भरधाव ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक, वाहनाचा चक्काचूर

पुणे : खरा पंचनामा 

पुणे-सातारा महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या एका ट्रकला पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात ट्रकचा समोरील भाग अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या अघतात एक जण गंभीररीत्या जखमी झाला आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावरून जात असताना एक ट्रक तांत्रिक बिघाडामुळे रस्त्याच्या बाजूला उभा केला होता. मध्यरात्रीची वेळ असल्याने आणि अंधार असल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रक चालकाला या बंद पडलेल्या ट्रकचा अंदाज आला नाही. परिणामी, हा भरधाव ट्रक थेट समोर उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकला. ही धडक एवढी तीव्र होती की यात पाठीमागून धडकलेल्या ट्रकच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या दुर्दैवी अपघातात धडक देणाऱ्या ट्रकचा चालक केबिनमध्ये अडकल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नानंतर केबिनमध्ये अडकलेल्या जखमी चालकाला बाहेर काढण्यात आलं. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातामुळे पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. महामार्गावर काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आता अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून हटवलं आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला? चालक दारुच्या नशेत होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.