या दोन खासदारांना लागली लॉटरी, थेट केंद्रात मंत्रिपद मिळणार
मुंबई : खरा पंचनामा
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अशातच आता यातीला संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर या दोन खासदारांना केंद्रात दीड-दीड वर्ष मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्या ठाकरे गटातील 6 बंडखोर खासदार मुंबईत परतले असून नंदनवन येथे एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. या भेटीनंतर ते शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा करणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती, त्यानंतर काही दिवसांपूर्वी 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. यात खासदार संजय जाधव आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश होता. आता या खासदारांना शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मंत्रिपद दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोघांना दीड-दीड वर्षे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद दिले जाणार असल्याचे समोर आले आहे.
आज बंडखोर खासदार मुंबईत दाखल झाले, यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या खासदारांवर सडकून टीका केली आहे. 50 50 कोटीला विकले गेलेले चार खासदार मुंबई विमानतळावर उतरले आणि भेदरलेल्या नजरेने शशस्त्र पोलिस गराड्यात बाहेर पडले. ये जिना भी क्या जिना है लल्लू? चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे! ह्यांची पुढील पिढी सांगेल. मेरा बाप गद्दार था. मेरा पती गद्दार था. मेरा नाना गद्दार था! जय महाराष्ट्र !
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.