Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यावर तलवारीने सपासप वार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यावर तलवारीने सपासप वार

सोलापूर : खरा पंचनामा 

सोलापूरमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्यावर तलवारीने खुनी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या हल्ल्यात अजित बोरकर गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अकलूज येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

गावातील स्थानिक दोन गटांतील वाद सोडवण्याचा प्रयत्न केल्याच्या रागातून संशयित आरोपींनी बोरकर यांच्यावर हा हल्ला केल्याची फिर्याद अकलूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक तैनात केले आहे.

अजित बोरकर यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्यामुळे माळशिरस तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अकलूज पोलीस अधिक तपास करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

१९ जून रोजी सायंकाळी अजित बोरकर हे त्यांच्या निमगाव पाटी येथील कार्यालयासमोर मित्रांसोबत बोलत उभे होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या एका स्कॉर्पिओ गाडीमधून आलेल्या संशयित आरोपी सोमनाथ रुपनवर, आर्यन बोरकर, रणजीत बोरकर, गणेश जानकर आणि गणेश मंडले यांच्यासह इतर तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याजवळ येऊन, "तू आमच्या वादात का पडतोस?" असा जाब विचारला. त्यानंतर या सर्वांनी मिळून बोरकर यांच्यावर तलवार आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. या मारहाणीत बोरकर गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या खांद्यावर आणि कमरेवर खोलवर जखमा झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.