लोहगड हत्याकांडात चेतनचा नोकर माफीचा साक्षीदार; सिया-चेतनच्या अडचणी वाढल्या
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडात आता मोठी घडामोड समोर आली आहे. सुरुवातीला अपघाताचा बनाव करण्यात आलेल्या या प्रकरणात पोलिसांच्या तपासाला नवी दिशा मिळाली आहे. या हत्येचा कट उघड करण्यासाठी पोलिसांना आता एक महत्त्वाचा माफीचा साक्षीदार मिळाला असून, त्याचा जबाब या प्रकरणात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
मुख्य आरोपी चेतन चौधरीच्या दुकानात काम करणाऱ्या नीरज कुमारने पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. आता यामुळे सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तपासात नीरजच्या मोबाईलचा वापर कसा करण्यात आला, चेतनने आपले लोकेशन लपवण्यासाठी कोणता डाव आखला आणि लोहगडावरील घटनाक्रम काय होता, याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
१८ जून म्हणजेच हत्येच्या दिवशी चेतन चौधरीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःचे लोकेशन लपवण्यासाठी त्याने आपल्या नोकराचा फोण वापरला. सकाळी सव्वासात वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत असे जवळपास 10 तास चेतन चौधरीने स्वतःचा मोबाईल त्याचा नोकर नीरज कुमारकडे ठेवला होता. दिवसभरात चेतनच्या मोबाईलवर जेवढे फोन आले, ते सर्व फोन चेतनच्या सांगण्यावरून नीरजने उचलले. जेणेकरून चेतन पुण्यातच किंवा आपल्या दुकानातच हजर आहे, असा आभास निर्माण करता येईल. त्याने केतनची हत्या करण्यासाठी लोहगडावर नीरज कुमारचा मोबाईल सोबत नेला होता.
हत्येच्या दिवशी दिवसभर नीराजच्या फोनचे लोकेशन लोहगड किल्ला आणि त्याच्या आसपासच्या परिसरात ट्रेस झाले होते. आता नीरजने स्वतः दिलेल्या जबाबावरून हे सिद्ध झालं आहे की, तो फोन त्याच्याकडे नसून मालक चेतन चौधरीकडे होता. या डिजिटल पुराव्यामुळे आणि नीराजच्या जबाबामुळे हत्येच्या वेळी चेतन चौधरी लोहगडावरच हजर होता आणि त्यानेच केतनला दरीत ढकलले, हे पोलिसांना न्यायालयात 100 टक्के सिद्ध करता येणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.