"तूच सांग काय शिक्षा देऊ?"
न्यायाधीशांच्या 'त्या' प्रश्नाने नराधम भीमराव कांबळेची बोबडी वळाली, भर कोर्टात नवा बनाव !
पुणे : खरा पंचनामा
राज्याला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर प्रकरणी आज सत्र न्यायालयाने नराधम भीमराव कांबळे याला दोषी असल्याचा निकाल दिला. कोर्टाने भीमराव कांबळे याला शिक्षा सुनावण्यापूर्वीच तुला कोणती शिक्षा द्यायची असा सवाल केला.
त्यानंतर सिद्ध झालेल्या दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा, आजीवन कारावास किंवा किमान २० वर्षांची कोठडी होण्याची दाट शक्यता आहे. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर कोर्ट रुममध्ये न्यायाधीशांनी तुला कोणती शिक्षा द्यावी असा सवाल केला. मात्र, त्यावर बोलताना आरोपी भीमराव कांबळेने पुन्हा बनाव रचला.
न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याच्यावर ठेवण्यात आलेले सर्व आरोप कायदेशीर पुराव्यांच्या आधारे सिद्ध होत असल्याचे सांगत दोषी जाहीर केले. चिमुकलीवर अत्याचार आणि त्यानंतर तिच्या हत्येच्या गुन्ह्यात नराधम दोषी ठरला. न्यायाधीशांनी त्याला, "तुझ्या विरोधात सर्व आरोप सिद्ध झाले आहेत. आता तूच सांग, तुला काय शिक्षा मिळावी?" असा सवाल केला.
न्यायाधीशांच्या या थेट प्रश्नावर आरोपी भीमराव कांबळे याने न्यायालयात स्वतःचा बचाव करण्याचा आणि सहानुभूती मिळवण्याचा शेवटचा प्रयत्न केला. त्याने गुन्ह्याची कबुली देण्याऐवजी पुन्हा एकदा खोट्याचा आधार घेतला. आरोपी भीमराव कांबळे म्हणाला की, "मी तिला घेऊन जाताना खाली पडलो आणि तिच्या डोक्याला मार लागला. मी तिला मारलेलं नाही..." आरोपी भर कोर्टात इतकं उघडपणे खोटं बोलत असल्याचे पाहून कोर्टरुममध्ये उपस्थित असलेले सर्वजण अवाक झाले.
आरोपीकडून पुन्हा सगळी घटना सांगितली जात असताना न्यायाधीशांनी त्याला अडवले. तू सांगत असलेला हा आता इतिहास झाला. तु गुन्ह्यात दोषी ठरला असल्याचे सांगितले. एका गुन्ह्यात जन्मठेप तर दुसऱ्या गुन्हात फाशीची शिक्षा असल्याचे सांगण्यात आले. तो प्रसंग आठव आणि सांग मी तुला काय शिक्षा देऊ? असे न्यायाधीशांनी भीमराव कांबळे याला सांगितले. नराधमाला मृत्यूदंड देण्याची सरकारी वकिलांनी मागणी केली. यापूर्वीही आरोपीने असे दोन गुन्हा केले आहेत आरोपीला माफी नको आरोपी दयेस पात्र नसल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.