पवारांच्या खासदाराचा नादच वेगळा !
खऱ्याखुऱ्या 'टायगर'च्या गळ्यात पट्टा बांधून मारला फेरफटका
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे खासदार नीलेश लंके यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओत नीलेश लंके थेट वाघासोबत फेरफटका मारताना दिसत आहेत. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या कथित 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना उधाण आलेले असतानाच समोर आल्याने विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नीलेश लंके खऱ्याखुऱ्या वाघासोबत फेरफटका मारताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या हातात असलेल्या जाड दोरीचे दुसरे टोक थेट वाघाच्या गळ्यात बांधलेले असल्याचे दिसते. रुबाबात चालणाऱ्या वाघाच्या मागे लंके सावधपणे चालताना दिसत आहेत. त्यांच्या या कृतीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या व्हिडीओत वाघ एका ठिकाणी थांबताच लंके त्याच्यासमोर जाऊन काही क्षण त्याच्याकडे रोखून बघता आहेत. त्यामुळे हा केवळ कृती आहे की त्यामागे एखादा प्रतीकात्मक राजकीय संदेश दडला आहे, याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटातील काही खासदार फुटण्याच्या चर्चामुळे 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा राज्यात रंगली आहे. त्यातच नीलेश लंके यांचा हा व्हिडीओ समोर आहे. राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.