Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मॉन्सून पुन्हा सक्रिय ! रायगड, पुण्यापर्यंत पोहोचला, ४८ तासात मुंबईत दाखल होणार

मॉन्सून पुन्हा सक्रिय ! 
रायगड, पुण्यापर्यंत पोहोचला, ४८ तासात मुंबईत दाखल होणार

मुंबई : खरा पंचनामा 

दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रात एन्ट्री केल्यानंतर मान्सूनची वाटचाल रखडली होती. १० जूनपासून पावसाने दडी मारली होती. एकीकडे पाऊस नाही आणि दुसरीकडे कडक ऊन यामुळे बळीराजासमोर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं होतं.

दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर अखेर सोमवारी मान्सूनची उत्तरेच्या दिशेनं वाटचाल सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनने सोमवारी अलिबागसह पुण्यापर्यंतचा भाग व्यापला आहे. पुढील ४८ तासात मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मॉन्सूनची महाराष्ट्रातील वाटचाल पुन्हा सुरू झालीय. मॉन्सूनने सोमवारी (२२ जून २६) कोकणात अलिबागपर्यंत आणि मध्य महाराष्ट्रात पुण्यापर्यंतचा भाग व्यापला. मॉन्सून प्रगतीची उत्तरसीमा सध्या अलिबाग, पुणे, निझामाबाद, दंतेवाडा, बालांगीर, सुंदरगढ, छत्रा, गया, मुझफ्फरपूर येथून जात आहे. पुढील ४८ तासांत मॉन्सून मुंबईसह राज्याचा आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता आहे.

राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. मुंबईसह परिसरात सोमवारी सकाळी अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला. तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. उत्तर गुजरातपासून ते मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान होत आहे. मंगळवारपर्यंत महाराष्ट्रासह तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार तसेच छत्तीसगडमध्ये मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

हवामान विभागाने पुढील तीन-चार दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे. सोमवारी (ता. २२) विजांचा कडकडाट आणि आणि वाऱ्यासह पावसाचा अंदाज दिला आहे, तर २३ आणि २४ ला जोरदार पावसाचा अंदाज दिला असून, २४ जूनपर्यंत 'यलो अलर्ट' दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.