Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उद्धव ठाकरे गटात मोठी खळबळ ! 'मातोश्री'वरील बैठकी आधी एक खासदार नॉट रिचेबल

उद्धव ठाकरे गटात मोठी खळबळ ! 
'मातोश्री'वरील बैठकी आधी एक खासदार नॉट रिचेबल

अहिल्यानगर : खरा पंचनामा 

शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार आपल्या गळाला लावल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली आहे. मात्र, त्याआधीच ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. एक खासदार 'संपर्क क्षेत्रा'च्या बाहेर गेल्याने चर्चांना उधाण आले आहे.

मुंबईत उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या आजच्या खासदारांच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत किती खासदार हजर राहणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, या बैठकीच्या आधीच ठाकरे गटाचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे अचानक 'नॉट रिचेबल' झाले आहेत. आज सकाळपासूनच त्यांचा मोबाईल फोन बंद येत असल्याने राजकीय वर्तुळात, विशेषतः ठाकरे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

राज्यात सध्या 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांनी जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पक्षाच्या सर्व खासदारांची एक तातडीची आणि महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुपारी ठीक साडेबारा वाजता होणाऱ्या य बैठकीला सर्व खासदारांनी कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहावे, असे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले होते. संपूर्ण राज्याचे लक्ष या बैठकीकडे आणि ठाकरे गटाच्या पुढील रणनीतीकडे लागलेले आहे.

मात्र, एकीकडे मुंबईत बैठकीची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असताना, दुसरीकडे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा फोन बंद असल्याने अनेक तर्कवितर्काना उधाण आले आहे. पक्षप्रमुखांनी स्वतः बोलावलेल्या या संवेदनशील बैठकीला वाकचौरे उपस्थित राहणार की दांडी मारणार? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या शिर्डी दौऱ्यातील पक्षाच्या कार्यक्रमातही वाकचौरे अनुपस्थित होते.

दरम्यान, खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे मागील दोन दिवसांपासून कुटुंबासह बाहेरगावी गेल्याची माहिती आहे. मात्र, त्यांचे नॉट रिचेबल असल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. वाकचौरे यांच्या या 'नॉट रिचेबल' होण्यामागे केवळ तांत्रिक कारण आहे की राजकारणात पुन्हा काही मोठी उलथापालथ होणार, या भीतीने ठाकरे गटाच्या गोटात खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.