Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली पोलीस दलात मोठे फेरबदल३२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व मुदतवाढ

सांगली पोलीस दलात मोठे फेरबदल
३२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व मुदतवाढ

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्हा पोलीस दलात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आणि प्रशासकीय निकडीमुळे मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या २२ जून २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार, जिल्ह्यातील एकूण ३२ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या आणि मुदतवाढ देण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जारी केले आहेत. या आदेशामध्ये पोलीस निरीक्षक (PI), सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बदल्या व मुदतवाढ खालीलप्रमाणे:
पोलीस निरीक्षक (PI):
वाहतुक शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक मुकुंद वसंतराव कुलकर्णी यांना प्रशासकीय कारणास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील अजय जनार्दन सिंदकर यांची जिल्हा विशेष शाखेत तर संतोष रंगराव पवार यांची मानवी संसाधन शाखेत बदली झाली आहे.

 सहाय्यक पोलीस निरीक्षक (API):
आर्थिक गुन्हे शाखेचे सागर गणपती पाटील यांना मुदतवाढ मिळाली आहे. मिरज ग्रामीणचे रणजित रघुनाथ तिप्पे यांची वाहतुक शाखा मिरज येथे, तर वाहतुक शाखा मिरजचे सुनिल महादेव गिड्डे यांची संजयनगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

नियंत्रण कक्षातून विभावरी नारायण रेळेकर (ईश्वरपूर पो. ठाणे), विक्रांत राजेंद्र संकपाळ (डायल ११२), तबस्सुम जमाल मगदुम (महिला कक्ष), किशोरकुमार मारुती खाडे (सांगली शहर पो. ठाणे) आणि निलेश नाथा बागाव (विश्रामबाग पो. ठाणे) यांच्या नवीन नेमणुका झाल्या आहेत.

 पोलीस उपनिरीक्षक (PSI):
 चिंचणी वांगी पो. ठाणेचे योगेश अधिकराव शेलार, ईश्वरपूरचे समाधान सुब्राव घुगे, नियंत्रण कक्षाचे निवास शंकर मोरे, सांगली ग्रामीणचे नितीन राजेंद्र बाबर आणि मिरज ग्रामीणचे वैभव बळवंत पाटील यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

याशिवाय प्रविण सर्जेराव जाधव (विटा), पुजा अजित येळेकर (विटा), राजु मारुती केंद्रे (तासगाव), पांडूरंग मुरलीधर मुंडे (म. गांधी चौक, मिरज), सुजाता लक्ष्मण भोपळे (संजयनगर), जीवन किरण कांबळे (संजयनगर), संतोष शिवाजी यादव (दंगल नियंत्रण पथक) यांच्यासह एकूण २१ उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.

बदली झालेल्या सर्व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा कार्यभार दुय्यम अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून, नवीन नेमणुकीच्या ठिकाणी त्वरित हजर व्हावे आणि तसा पूर्तता अहवाल सादर करावा, असे निर्देश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले आहेत. तसेच या अधिकाऱ्यांचे वेतन व भत्ते आता बदली झालेल्या नवीन ठिकाणाहून काढण्यात यावेत असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.