Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुणे दारूकांड प्रकरणातील आरोपींना 'मकोका' लावणार ! २२ मृतांच्या कुटुंबांना ७ दिवसांत मदत देण्याची गृहराज्यमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा

पुणे दारूकांड प्रकरणातील आरोपींना 'मकोका' लावणार ! 
२२ मृतांच्या कुटुंबांना ७ दिवसांत मदत देण्याची गृहराज्यमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई : खरा पंचनामा 

पुण्यातील दापोडी-हडपसर परिसरात विषारी दारू प्यायल्याने २२ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) कारवाई करण्याबाबत शासन गंभीरतेने विचार करीत आहे.

शिवाय या दारूकांडात मृत्यू झालेल्या सर्व २२ मृतांच्या कुटुंबीयांना पुढील सात दिवसांत आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत दिली.

पुण्यातील दारूकांडामध्ये २२ जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला. मात्र यातील फक्त ९ जणांच्या कुटुंबीयांनाच आर्थिक मदत करण्यात आली आहे. याबाबत आज भाजप आमदार अमित गोरखे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. यावेळी या प्रकरणाला जबाबदार असणार्या पोलीस उपनिरीक्षक अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) सदस्य अॅड. अनिल परब यांनी केला. तर या घटनेचा मुख्य सूत्रधार योगेश वानखेडे, कर्नल सिंग विरखा, राधेशाम प्रजापती यांच्यावर 'आयपीसी' अंतर्गत गुन्हे दाखल करा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. या गुन्ह्यासाठी बोगस आधार कार्ड वापरून भिवंडीतून २१५ लिटर मिथेनॉल पुण्यात नेण्यात आल्याचे दानवे यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणीही त्यांनी केली. सचिन अहीर यांनी मृतांच्या कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली.

या दारूकांडप्रकरणी स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांसह अनेक जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या सर्व आरोपींवर आधीच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल असून हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्याने मुख्य सूत्रधारांना 'मकोका' लावण्याबाबत कायदेशीर अभ्यास सुरू असल्याची माहिती योगेश कदम यांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.