Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत विवेकानंद केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

सांगलीत विवेकानंद केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

सांगली : खरा पंचनामा 

विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा, सांगली यांचा वर्धापन दिन रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत संस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

या संस्कार वर्गामध्ये गीता पठण, मनाचे श्लोक, मैदानी खेळ तसेच बौद्धिक विकास वाढविणाऱ्या विविध उपक्रमांचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रांत प्रमुख मनोजंव शेडबाळकर तसेच सुहासिनी ताई राणे, संजय सोनटक्के उपस्थित होते.  विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभाषेची जाणीव, शारीरिक सुदृढता आणि बौद्धिक प्रगती  घडविण्याच्या हेतूने दर रविवारी मोफत शिबीर आयोजित केले जाते.

कार्यक्रमाचे संयोजन सुनील कुलकर्णी यांनी केले तर सहसंयोजन मधुरा पुजारी यांनी केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.