Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आरळ्यातील तरुणांवरील गुन्ह्यांचे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवून गुन्हे मागे घ्यायला लावू : आमदार संग्राम जगतापआरळा येथे हिंदू जनआक्रोश मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद

आरळ्यातील तरुणांवरील गुन्ह्यांचे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवून गुन्हे मागे घ्यायला लावू : आमदार संग्राम जगताप
आरळा येथे हिंदू जनआक्रोश मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद 

शिराळा : खरा पंचनामा 

सांगलीच्या शिराळा तालुक्यातील आरळा गावात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आरळा गावातील काही तरुणांवर एका समाजातील कुटुंबाकडून खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत हा  मोर्चा काढून  निषेध व्यक्त करण्यात आला. या मोर्चात आमदार  संग्राम जगताप यांनी या गावातील गुन्हे दाखल झालेले प्रकरण आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पोहोचवून आणि ज्या तरुणांवर  गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे मागे घ्यायला लावू असं म्हटले आहे. 
आमदार सत्यजीत देशमुख , हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्रामबापू  भंडारे  हे देखील मोर्चात सहभागी झाले होते. आरळा गावातील अंबाबाई चौकातून या मोर्चाला सुरूवात आणि गावातील विविध भागातून  या मोर्चाचे सभेत रूपांतरण झालें. आरळा गावातील काही तरुणांवर एका समाजातील कुटुंबाकडून खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत हा मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.

आरळा गावात हिंदुत्वाचा आवाज दाबण्यासाठी, हिंदुत्ववादी तरुण आणि ह.भ.प. अनिल देवळेकर महाराज यांच्याविषयी जिल्हा पोलीस प्रशासनाला खोटी माहिती देऊन त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लावणाऱ्या काही देशविरोधी, जातीवादी व दहशतवादी जिहादी शक्तींच्या निषेधार्थ हा हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चामध्ये बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी मोर्चाला येणाऱ्या मोर्चेकरांच्या गाड्या अडवल्याने पोलिसांना चांगले सुनावले. पोलिसांनी आज मोर्चाला येणाऱ्यांना अडवले, मोर्चाला गेला तर गुन्हे दाखल होतील असे मोर्चेकऱ्यांना पोलिस सांगत होते.  ज्यांना अडवायचे ते अडवत नाही, आणि भगवी टोपी घालून येणाऱ्या मोर्चेकऱ्याच्या गाड्या अडवता. या मोर्चेकऱ्याच्या गाड्यात शस्त्र होती काय, ड्रग्ज होते काय असा सवाल करत आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांना सुनावले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.