Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सोलापूर ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल१३ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

सोलापूर ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल
१३ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

पूजा फडके 
सोलापूर : खरा पंचनामा 

सोलापूर ग्रामीण पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव आणि विनंतीवरून मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी (भा.पो.से.) यांनी २९ जून २०२६ रोजी झालेल्या जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीनंतर या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम २२ न (२) अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून, २ वर्षे कालावधी पूर्ण झालेले, पदोन्नतीने हजर झालेले तसेच विनंती बदली अर्ज केलेल्या १३ पोलीस अधिकाऱ्यांची नवीन ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी :
पोनि अविनाश एकनाथ पवार  नियंत्रण कक्ष ते अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे 
पोनि कुंदन तुकाराम गावडे : वैराग पोलीस ठाणे, ते सोलापूर तालुका पोलीस ठाणे 
पोनि दिपक ज्योतिराम पाटील :  नियंत्रण कक्ष ते मोहोळ पोलीस ठाणे 
पोनि बाळू रसिक भरणे : वाहतूक शाखा ते टेंभुर्णी पोलीस ठाणे 
पोनि अमोल शंकर कादबने : नियंत्रण कक्ष ते वैराग पोलीस ठाणे 
पोनि दशरथ भानुदास वाघमोडे : पंढरपूर शहर पोलीस ठाणे  ते माळशिरस पोलीस ठाणे 
पोनि तय्यब युनूस मुजावर : पंढरपूर तालुका पोलीस ठाणे ते पंढरपूर शहर पोलीस ठाणे 
पोनि सुरेश गणपतराव चिल्लावार : अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे ते 
पंढरपूर तालुका पोलीस ठाणे 
पोनि विकास चन्नवीर दिंडूरे : माळशिरस पोलीस ठाणे ते सायबर पोलीस ठाणे 
पोनि दिपक लक्ष्मण बरडे : नियंत्रण कक्ष ते जिल्हा वाहतूक शाखा 
पोनि कमलाकर नरसिंह गड्डिमे : नियंत्रण कक्ष ते आर्थिक गुन्हे शाखा 
सपोनि अक्षय आप्पासाहेबा सोनवणे : पंढरपूर तालुका पोलीस ठाणे ते बार्शी तालुका पोलीस ठाणे (प्रभारी) 
सपोनि गणेश आण्णासाहेब कड आर्थिक गुन्हे शाखा ते सोलापूर तालुका पोलीस ठाणे

आदेशात नमूद केलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ आपापल्या नवीन कर्तव्यस्थळी हजर होऊन, तसा अनुपालन अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.