गाडीतून नेताना २ गोळ्या झाडल्या, एक प्रायव्हेट पार्टमध्ये
आईचा गंभीर आरोप, पोलिसांवर गुन्हा दाखल
पटना : खरा पंचनामा
भोजपूरमध्ये भरत तिवारी एन्काउंटर प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. बिहारमध्ये यावरून तणावाचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांवर या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाला असून चौकशी केली जात आहे.
आता भरत तिवारीच्या आईने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आशा देवी यांनी म्हटलं की, पोलिसांनी भरतवर पोलीस व्हॅनमध्ये दोन गोळ्या झाडल्या. इतकच नाही की त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्येही गोळी झाडली होती.
भरत भूषण तिवारी याच्या आईसह बहिणीने पोलिसांवर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांसमोर शरणागती पत्करल्यानंतर भरतवर गोळी झाडल्याचा दावा आई आणि बहिणीने केलाय. त्याला तीन गोळ्या मारल्या आणि जखमी अवस्थेत रुग्णालयात नेताना गाडीतच दोन गोळ्या झाडल्या. पोलिसांनी जाणीवपूर्वक त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गोळी मारली असा धक्कादायक दावाही आईने केलाय.
माझ्या मुलाला दगा देऊन मारण्यात आलं. एन्काउंटरच्या नावाखाली त्याची हत्या करण्यात आली असा आरोप आईने केलाय. गुन्हा दाखल झालाय, फक्त न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. मुलाला मारणाऱ्याला फाशी होईल तेव्हाच खरं असं म्हणत आई आशा देवी यांना अश्रू अनावर झाले.
एन्काउंटरच्या पाच दिवसानंतर जगदीशपूरचे एसडीपीओसह इथर पोलिसांवर गुन्हा दाखळ झाला आहे. दोषी पोलिसांना तुरुंगात पाठवण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचंही भरतच्या कुटुंबियांनी म्हटलं.
भरतला १७ जून रोजी सकाळी एन्काउंटरमध्ये पोलिसांनी गोळी मारली होती. त्यावेळी एफआयआर दाखल न करता पोलिसांनी भरतसह त्याचे वडील आणि भावावर वेगवेगळा गुन्हा दाखल केला होता. तसंच रस्त्यावर याविरोधात आंदोलन केल्यानं ट्राफिक जाम झाल्यानं आंदोलकांवरही गुन्हा दाखल केला होता. शेवटी पीडित कुटुंबियांसह नागरिकांच्या आंदोलनानंतर २२ जूनला पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.