Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गुटखा मिळेना म्हणून तुकाराम मुंढेंना शिवीगाळआक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या परप्रांतीय ओला चालकाला अटक

गुटखा मिळेना म्हणून तुकाराम मुंढेंना शिवीगाळ
आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या परप्रांतीय ओला चालकाला अटक

ठाणे : खरा पंचनामा 

राज्यात एकीकडे अनेक ठिकाणी छापेमारी करून भेसळ रोखण्याचं काम करणाऱ्या तुकाराम मुंढे यांचं कौतुक सुरू असलं तरी काही भुरट्या आणि विकृत लोकांकडून त्यांच्याविरोधात राग व्यक्त केला जात असल्याचं चित्र आहे.

कल्याणमध्येही असाच काहीसा प्रकार घडला. कोणत्याही टपरीवर गुटखा मिळत नाही म्हणून एका परप्रांतीय व्यक्तीने तुकाराम मुंढे यांच्याविरोधात व्हिडीओ करत त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला. दुर्गाप्रसाद पांडे असं आरोपीचं नाव असून खडकपाडा पोलिसांनी त्याला गजाआड केलं आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात गुटखा बंद केला असून गुटखा विक्री करण्याऱ्याच्या विरोधात मोक्का लावण्याचं जाहीर केलं आहे. तुकाराम मुंढे यांच्या या इशाऱ्यामुळे बहुतांश ठिकाणी गुटखा बंद झाला आहे. कल्याणमध्येही हे चित्र आहे.

गुटखा मिळत नाही या रागातून दुर्गाप्रसाद पांडे या ओला कॅब चालकाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यामध्ये या पांडेने तुकाराम मुंढे यांना अश्लील आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचं दिसून आलं. मात्र ही शिवीगाळ या पांडेला चांगलीच महागात पडल्याचं दिसून आलं. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अवघ्या चार तासांत या विकृताचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुटख्याची टंचाई निर्माण झाल्याने आणि एफडीएच्या कडक कारवाईमुळे गुटखा मिळत नसल्याने आरोपी दुर्गाप्रसाद पांडे प्रचंड नाराज होता. त्यातच त्याच्या वडिलांची टपरी देखील बंद झाली होती. या सर्व गोष्टींचा राग मनात धरून त्याने थेट एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ करणारा व्हिडीओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केले.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. कल्याण परिमंडळचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक मारुती आंधळे आणि पोलीस अधिकारी भूषण देवरे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून अवघ्या 4 तासांच्या आत आरोपीला अटक केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.