Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी खळबळ ! ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करणार?

ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी खळबळ ! 
ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करणार?

मुंबई : खरा पंचनामा 

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ऑपरेशन टायगर राबवले जात आहे. या मोहिमेअंतर्गत ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार फोडण्याचा प्रयत्न केला जातोय, असे म्हटले जात आहे.

हीच बाब लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पक्षाच्या सर्वच खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. दरम्यान आता ठाकरेंच्या याच खासदारांबाबत मोठी आणि खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. ठाकरेंचे खासदार फुटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून काही खासदार वेगळा गट स्थापन करू शकतात, असे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठ्या हालचाली वाढल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार नवा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. कालच ठाकरे यांच्या खासदारांची ठाकरे यांच्या खासदारांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर आमचे सर्वच खासदार आमच्यासोबत आहेत. ते पक्ष सोडून जाणार नाहीत, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. ऑपरेशन टायगर काहीही नाही. आता आम्हीच ऑपरेशन लांडगा सुरू करणार आहोत, असे राऊत म्हणाले होते. परंतु आता ठाकरे यांचे काही खासदार थेट नवा गटा स्थापन करण्याच्या तयारीत आहेत, असे म्हटले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंचे काही खासदार हे लोकसभा अध्यक्षांना एक पत्र देण्याची शक्यता आहे. ठाकरे यांचे काही खासदार हे दिल्लीमध्ये शिंदे यांच्या पक्षाचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना भेटले आहेत. त्यामुळे लवकरच हे खासदार नवा गट स्थापन करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले आहे. सध्या दिल्लीत घडत असलेल्या घडामोडी लक्षात घेता ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत हे तातडीने दिल्लीला निघाले आहेत.

दरम्यान, ठाकरेंनी 14 जून रोजी आयोजित केलेल्या खासदारांच्या बैठकीला एकूण पाच खासदार अनुपस्थित होते. त्यामुळे लवकरच काहीतरी मोठं घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.