रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जल्लोष, संभाजीराजेंची कुटुंबासह हजेरी
रायगड : खरा पंचनामा
आज संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर तर रात्रीपासून या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्याला देशभरातून लाखो शिवभक्तांची मांदियाळी जमली असून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे किल्ले रायगडावर शिवमय वातावरण निर्माण झालं असून अवघा रायगड महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमला आहे.
दरम्यान, शुक्रवारी रात्री रायगडावर शिवाजी महाराजांच्या पोवाड्यांचा "शाहीर जागर" कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती आपल्या कुटुंबासह उपस्थित होते. पोवाडा सुरू असताना त्यांनी आणि त्यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती सुरात सूर मिसळला. यामुळे कॅमेऱ्यांच्या सगळ्या नजरा त्यांच्यावर खिळल्या.
याचवेळी एका लहानगा शिवभक्त मात्र भाव खाऊन गेला. त्याने शिवाजी महाराजांच्या पोवाड्यावर ठेका धरत डान्स केला. त्याने गायकांच्या सूरात सूर मिसळत पोवाडा गायला, तसेच त्यावरच ठेका धरला. याचा संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.